सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी गावच्या हद्दीत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कत्राटदाराकडे काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराचा घराकडे फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून लोंखडी रॉडने मारहाण करून व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळच्या पोलीसांनी आरोपीस गुरूवारी अटक केली आहे. सिंकदर हरीप्पा गंजू असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. तर सोनुकुमार शंभूसिंग असे आरोपीचे नांव आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मिरज पंढरपूर मार्गावरील लांडगेवाडी गावच्या पूर्वेला तानाजी व संभाजी कदम यांच्या शेताजवळ बुधवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी सोनुकुमार व मयत सिंकदर हे दोघे गेले होते. आरोपीने मयत सिंकदर यांस घरी फोन करावयाचा आहे म्हणून मोबाईल मागितला. परंतु सिंकदरने मोबाईल दिला नाही. याचा राग आल्याने आरोपी सोनुकुमार यांने लोखंडी रॉडने तोंडावर व बरगडीवर मारहान केली. व त्यानंतर आरोपी सोनुकुमारने सिंकदरचा गळा दाबला असल्याचे शवविच्छेदन नंतर दिसून आले असल्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी सांगितले.
यातील मयत सिंकदर गंजू हा त्यावेळी दारूच्या नशेत होता. गुरूवारी सकाळी श्र्वानपथक दाखल झाले. श्र्वानने आरोपी रहात असलेल्या खोलीपर्यत मार्ग दाखविला आहे. यातील मयत सिंकदर गंजू हा परप्रांतीय मजूर दिलीप बिल्डकॉन कंपनीचे कंत्राटदार श्री नागराज यांच्याकडे काम करीत होता.