नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ‘या’ भाजप नेत्याची थेट राज्यपालांकडे मागणी

Nawab Malik
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण करून त्यांच्याविरुद्ध अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी पत्राद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

bhagatsnigh koshyari

काय म्हणाले चंद्रकांत पाटील
“केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे केला. तसेच त्यांनी या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा दिला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करून, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले आहे.

Letter

या कोरोना संकटाच्या काळात अफवा पसरवून जनतेत भीती निर्माण केली. नवाब मलिक यांनी केलेल्या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी त्यांची सरकारमधून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी. असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रामध्ये लिहिले आहे. नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टीसाठी भाजपचे शिष्टमंडळ राजभवनावर दाखल झाले आहे. यामध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांचा समावेश आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक
नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी रेमडेसिवीरवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाही आहे. केंद्र सरकारकडून त्यास नकार देण्यात येत होता असे नवाब मलिक यांनी म्हणले होते. तसेच केंद्र सरकारने जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली अशी धक्कादायक माहिती कंपन्यांकडून देण्यात आली आहे.