हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अधिवेशनातील चर्चेवेळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक मुद्यांवरून खडाजंगी झाली. यावेळी वीज कनेक्शन तोडण्यावरून व वीज बिल माफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्याना धारेवर धरले. यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी शंभर वेळा बोलले कि काला धन लाने का? लाने का तो कहा राखणे का? असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी भास्करराव जाधव यांना निलंबित करावे, अशी मागणी केली.
कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत अशी मागणी केल्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी भास्करराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी जे बोलले त्याची मिमिक्री करू दाखवली. त्यांच्या या मिमिक्रीवरून विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. यावेळी फडणवीस म्हणाले की, भास्करराव जाधव यांच्याकडून आमच्या पक्षातील पंतप्रधान यांची मिमिक्री करून दाखवली जातेय. हे आम्ही कदाफी खपवून घेणार नाही. भास्करराव जाधव यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भास्करराव जाधव यांनी केलेल्या मिमिक्रीबद्दल भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी भास्करराव जाधव यांनी केलेल्या विधानाबद्दल व मिमिक्रीबद्दल स्पष्टीकरण दिले. यावेळी जाधव म्हणाले कि, मी एका कार्यकर्त्याने बोलल्याचे सांगितले मी त्याची मिमिक्री केलेली नाही. यावेळी भाजप नेत्यांनी भास्करराव जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.