हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील मालमत्तेवर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर राऊतांवर मनसेनेही राऊतांवर निशाणा साधला आहे. या कारवाईवरून मनसेने राऊतांची खिल्ली उडवली असून “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” अशी टीका मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी केली आहे.
मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी आज ट्विट केले असून त्यांनी ट्विट द्वारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” असे ट्विट करत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.
मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते…!
ED ने थेट राष्ट्रवादी च्या भोंग्यावरच कारवाई केली.
😝😝😝😝😝— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 6, 2022
मनचिसेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करुन या कारवाईसंदर्भात मत व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला केलेल्या भाषणातील मुद्दा जोडत खोपकर यांनी राऊतांची खिल्ली उडवली. मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते. ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली, अशी बोचरी टीका मनसेनं केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हे ट्विट रिट्विट करत राऊतांची खिल्ली उडवली आहे.