मुंबई । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं मुंबईतील लोकल गाड्या काही प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारला केली आहे. येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करता आव्हाड यांच्या मागणीला महत्त्व आहे.
लोकल सुरु कारण्यासंदर्भांत आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ‘मुंबईतील रुग्णालयांत सेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी दूर उपनगरांत किंवा मुंबईबाहेर राहतात. लोकल ट्रेनची सोय असल्याशिवाय ते कामावर रुजू होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोदी सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरू कराव्यात,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या आतापर्यंत ४० हजारांच्याही पुढं गेली आहे. त्यांच्यावर मुंबई शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना सेवा देणारे कर्मचारी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये तसंच, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, विरारपर्यंत राहणारे आहेत. लोकल गाड्या सुरू नसल्यानं त्यांना रुग्णालयांत पोहोचताना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांत बेड असूनही कर्मचारी नसल्यानं ते मोकळेच पडून आहेत. आरोग्य कर्मचारी उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयांनाही पूर्ण क्षमतेनं रुग्णसेवा करणं शक्य होणार आहे.
मोदी सरकारनी मुंबईत ट्रेन काही प्रमाणात अत्यावश्यक सेवेंसाठी सुरु करायला हव्यात. रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किवा दूर वर राहतात त्या शिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही आणि त्या मुळे रुग्ण सेवा व्यवस्थित होत नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”