ज्वेलर्ससाठी चांगली बातमी! हॉलमार्किंगच्या नोंदणीसंदर्भात सरकार लवकरच करणार मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज 21 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्वेलर्स आणि शुद्धता तपासणीसाठी हॉलमार्किंग केंद्रांच्या (A & H Centres) नोंदणीसाठी BIS ने तयार केलेल्या मॉड्यूल्सचे अनावरण केले. पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वेबसाइटवर आणखी नवीन फीचर्स जोडले जातील. जेणेकरुन, व्यवसायिक घरातून अगदी सहजपणे हॉलमार्किंग करू शकतील.

या नवीन मॉड्यूलद्वारे व्यवसायिक सहजपणे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. त्याला त्वरित सर्टिफिकेट मिळेल. डॉक्युमेंटसच्या व्हेरिफिकेशन साठी वेळ दिला जाईल.

 

BIS-Care मोबाइल अ‍ॅप द्वारे कळेल सोन्याची सत्यता
रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वीच हे BIS अ‍ॅप लाँच केले होते. या अ‍ॅपद्वारे सोन्याच्या वस्तूंची सत्यताही तपासली जाऊ शकते. कोणत्याही वस्तूशी संबंधित तक्रार, लायसेन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्कची सत्यता आता बीआयएस अ‍ॅपद्वारे तपासली जाऊ शकते.

या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा लायसेन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहकही त्वरित तक्रार करू शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहिती मिळेल. हिंदी आणि इंग्रजीमध्ये काम करणारे हे अ‍ॅप कोणत्याही अँड्रॉइड फोनवर ऑपरेट केले जाऊ शकते आणि गुगल प्ले स्टोअर वरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment