Monkeypox Virus : आता ‘या’ भयानक आजाराने वाढवलं जगाचं टेन्शन; माकडांपासून आलेल्या व्हायरस बाबत जाणून घ्या

monkeypox virus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील कोरोना विषाणूचा कहर अजूनही संपलेला नाही तोच मंकीपॉक्स (Monkeypox Virus) नावाच्या विषाणूने आता अनेकांचं टेन्शन वाढवलं आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्सचा प्रसार सुरू झाला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती समोर आली आहे. ही व्यक्ती नुकतीच कॅनडाला गेली होती. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने संसर्गाची पुष्टी केली आहे.

अमेरिकेत मन्कीपॉक्सचा रुग्ण सापडण्याची या वर्षीची ही पहिलीच घटना आहे. गेल्या वर्षी टेक्सास आणि मेरीलँडमध्ये प्रकरणे नोंदवली गेली होती. हे लोक नायजेरियाला गेले होते. ब्रिटन, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत. Monkeypox Virus

मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 7 मे रोजी आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 9 बाधित रुग्ण समोर आले आहेत. त्याच वेळी पोर्तुगीज मध्येही मंकीपॉक्सचे 5 रुग्ण आढळले आहेत. स्पेन 20 हून अधिक संभाव्य संक्रमित रूग्णांची तपासणी करत आहे.

मंकीपॉक्स विषाणू काय आहे? (Monkeypox Virus)

मंकीपॉक्स हा स्मॉलपॉक्स सारखाच एक विषाणूजन्य संसर्ग आजार आहे जो उंदीर, विशेषतः माकडांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. जर एखाद्या प्राण्याला या विषाणूची लागण झाली आणि माणूस त्याच्या संपर्कात आला तर त्यालाही मंकीपॉक्स होण्याची शक्यता असते.

मन्कीपॉक्स चा संसर्ग कसा होतो?

  • ज्या लोकांना मन्कीपॉक्सचे संक्रमण आहे त्यांना न्यूमोनियाची लक्षणे दिसू शकतात.
  • हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.
  • हा रोग संक्रमित व्यक्तीला स्पर्श करून, त्याच्या शिंकाने किंवा खोकल्याच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरून इतर व्यक्तीमध्ये पसरू शकतो. Monkeypox Virus

मंकीपॉक्स झालाय हे कसं ओळखावं?

  • मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ परंतु गंभीर विषाणूजन्य आजार आहे जो सामान्यतः फ्लू सारख्या लक्षणांनी सुरू होतो.
  • याची सुरुवात लिम्फ नोड्सच्या सूजाने होते, जी नंतर चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ बनते.
  • संसर्गाची बहुतेक प्रकरणे दोन ते चार आठवडे टिकतात.

11 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 80 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लंडनमध्ये 5 मे रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हा हा संसर्ग एकाच कुटुंबातील 3 लोकांमध्ये दिसून आला. त्याची माहिती 13 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती, परंतु आता हा आजार हळूहळू 11 देशांमध्ये पसरला आहे. Monkeypox Virus

युरोपातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा विषाणू

बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि ब्रिटनमध्ये मन्कीपॉक्स विषाणू पसरला आहे. याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांनीही चिंता वाढवली आहे. जरी WHO ने अद्याप या आजाराला महामारी म्हणून घोषित केले नसले तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हा एक संसर्गजन्य रोग आहे. काल या आजाराबाबत (Monkeypox Virus) WHO मध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या –

Gold Loan : पैशांची गरज भासतेय ??? ‘या’ बँकांकडून स्वस्त दरात मिळेल गोल्ड लोन

मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त; गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार