व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानंतर आता गृ विभागाच्या वतीने राज्यात पोलीस भेटीची प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामध्ये सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यांत लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती दहा हजार पदांसाठी आहे.

कोरोनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात आलेली नाही. मात्र, आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राज्य सरकारकडून पुन्हा लवकरच पोलीस भरतीचा निर्णय जारी केला जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारच्या गृह विभागाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तयारी केली जात आहे. मार्ग मोकळा झाला आहे.