मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. आज तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण सापडले असून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात अनेक निर्बंध लावून देखील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत 18 हजार 466 नवे रुग्ण आढळले आहेत. आज 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत राज्यात 66308 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ओमायक्रोन चे 653 रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत.
COVID19 | Maharashtra reports 18,466 new cases & 20 deaths today; Active cases 66,308. Omicron case tally reaches 653, of these 259 have been discharged pic.twitter.com/75MjN4N98G
— ANI (@ANI) January 4, 2022
दरम्यान, राजधानी मुंबईत तब्बल 10 हजार 860 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तर मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन सतर्क झाले असून काही इमारतींसाठी काही नव्या नियमावली जारी करण्यात आल्या आहेत.
इमारतींसाठी काय आहेत नियम
एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळले तर तो मजला सील करण्यात येणार आहे.
इमारतीत 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे
कोरोना रुग्ण सापडलेल्या मजल्यावर बाहेर येण्यास जाण्यास मज्जाव असणार आहे
आरटीपीसीआर टेस्ट होत नाही तोपर्यंत इमारत उघडण्यात येणार नाही किंवा अशा इमारतीस सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.