उद्धव ठाकरे हे बिनकामी पगारी मुख्यमंत्री; नवनीत राणांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे बिनकामी पगारी मुख्यमंत्री आहेत अशी जळजळीत टीका नवनीत राणा यांनी यावेळी केला तसेच कोणत्याही परिस्थितीत उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर आम्ही हनुमान चालीसा पठण करणारच असा पुनरुच्चार त्यांनी केला

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यावर संकटे आली आहेत. तब्बल २ वर्षानंतर ते वर्षावर गेले. एखादा व्यक्ती जर २ वर्ष कामावर गेला नाही तर त्याला कोणी पगार पण देणार नाही पण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिनकामाचे पगारी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी काहीच काम अडीच वर्षात केलं नाही, आणि राज्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकलं असं नवनीत राणा यांनी म्हंटल

धर्माचा प्रचार करण्यासाठी मला कोणीही थांबवू शकत नाही, मी थांबणारी नाही. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे त्यामुळे शिवसैनिक माझं काहीही बिघडवू शकत नाही .आम्ही आतंकवादी नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आलोय, त्यामुळे हिंसाचार झाल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील असे नवनीत राणा यांनी म्हंटल

संजय राऊत म्हणजे पोपट

संजय राऊत यांनी राणा दाम्पत्यावर केलेल्या टीकेवर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या , संजय राऊत म्हणजे पोपट आहेत. रोज सकाळी उठून पत्रकारांपुढे यायचं आणि कोणत्याही विषयांवर भाष्य करणं यात काही तथ्य नाही. आम्ही अपक्ष आहोत पण तुमच्या पक्षाला कोणामुळे मते मिळाली यांचा विचार करा असं नवनीत राणा यांनी म्हंटल