हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बर्याच गोष्टी माहिती असतील, परंतु अलीकडेच अनुभवी सुनील गावस्करने एमएस धोनीची एक सवय उघडकीस आणली असून त्यानंतर विराट कोहलीही या सवयीचे अनुसरण करीत असल्याचं म्हंटले आहे. महेंद्रसिंग धोनीची ही सवय आहे, ज्याबद्दल क्वचितच मीडियामध्ये छापले गेले असेल किंवा ऐकले गेले असेल. आणि ही सवय एमएसचे व्यक्तिमत्त्व म्हणून वर्णन करण्यासाठी पुरेशी आहे.
गावस्कर यांनी धोनीच्या या मनोरंजक सवयीबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ही सवय भारतातील सामन्यांमध्ये घरगुती उड्डाणादरम्यान दिसली. वास्तविक, टीम इंडियाचे खेळाडू बिझनेस व इकनॉमिक क्लासने प्रवास करतात. आणि असे घडते की जो कोणी खेळाडू सामन्यात चमकदार कामगिरी करतो, त्याला व्यवस्थापन बिझनेस क्लासने प्रवास करण्याचा पर्याय देतात. एकंदरीत,मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खेळाडूला हि संधी मिळण्याची शक्यता जास्त असते.
गावस्कर यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक अनिवार्यपणे बिझनेस क्लासने प्रवास करतात, परंतु असे असूनही स्वत: एमएस धोनी २००८ ते १६ या कालावधीत भारतातील सामन्यादरम्यान कर्णधार असूनही कवचितच बिझनेस क्लासने प्रवास केला आहे.
गावस्कर यांनी लिहिले की, भारतातील सामन्यादरम्यान दोन्ही संघ स्वत: चा चार्टर्ड विमानाने प्रवास करतात आणि त्याबरोबरच टीव्ही प्रक्षेपणातील क्रू मेंबर्सही प्रवास करतात. जेथे प्रशिक्षक आणि कर्णधार बिझनेस क्लासने प्रवास करतात आणि उर्वरित खेळाडू इकनॉमिक क्लासने. तथापि, शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही बिझनेस क्लासने जाण्याची संधी दिली जाते.
गावस्कर यांनी पुढे लिहिलं की धोनी आपल्या कर्णधारपदांमध्ये क्वचितच बिझनेस क्लासमध्ये बसला. २०११ च्या विश्वचषकात धोनीने इकनॉमिक क्लासने प्रवास करणाऱ्या टीव्ही कर्मचाऱ्यांसमवेत बसण्यास प्राधान्य दिले. आणि सध्याचा कर्णधार विराट कोहलीदेखील याचे अनुसरण करत आहे.दोन्ही कर्णधारांचे असे करण्यामागचे कारण म्हणजे खेळाडूंमध्ये संघभावना निर्माण करणे. विराटने त्याच्या नेतृत्वाखाली हे काम २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यावर केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.