Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : आपल्यातला प्रत्येकजण कुठे ना कुठे गुंतवणूक करतच असतो. त्यासाठी आपले पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच त्यावर चांगला रिटर्न मिळतील अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला गुंतवणूकदार प्राधान्य देतात. हे लक्षात घ्या कि, यामुळेच भारतीय पोस्ट ऑफिसच्या योजना लोकांना खूप आवडतात. पोस्ट ऑफिसकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी टाइम डिपॉझिट स्कीम ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात.

Finding Peace With Post Office Savings

हे लक्षात घ्या की, केंद्र सरकारकडून नुकतेच Post Office टाइम डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली होती. आता या मध्ये वार्षिक 6.7% पर्यंत व्याज दर दिला जातो आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची संधी दिली जाते. तसेच या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतील.

Bank Fixed Deposits: These Banks Hiked FD Interest Rates Recently; Check Latest Rates

कोणा-कोणाला खाते उघडता येईल ???

हे लक्षात घ्या कि, Post Office च्या टाइम डिपॉझिट स्कीममध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला 1,000 रुपयांच्या गुंतवणुकीने खाते उघडता येते. त्याच बरोबर यामध्ये कोणत्याही 3 प्रौढ व्यक्ती एकत्रितपणे खाते उघडू शकतात. तसेच कोणताही पालक आपल्या 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावाने टाइम डिपॉझिट खाते देखील उघडू शकतो.

SBI vs HDFC Bank vs Axis Bank vs ICICI Bank: Latest FD rates compared | Business News

व्याज दर जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, Post Office च्या टाइम डिपॉझिट्समध्ये वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे व्याज दर निर्धारित केले आहेत. जर एखाद्याने यामध्ये 5 वर्षांसाठी पैसे जमा केले तर त्याला वार्षिक 6.7% दराने व्याज दिले जाईल. तसेच यामध्ये तीन वर्षांच्या FD वर 5.8 टक्के, 2 वर्षांच्या FD 5.7% आणि एक वर्षाच्या FD वर 5.5 टक्के व्याज दिले जात आहे.

Tax Relief Tips for Business | Finance Bureau Business tax relief tips

टॅक्समध्येही मिळेल सूट

हे लक्षात घ्या कि, Post Office च्या या योजनेमध्ये गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट देखील मिळेल. मात्र, या मुदतीपेक्षा कमीच्या डिपॉझिटवर टॅक्स सूट दिली जाणार नाही. या योजनेमध्ये गुंतवलेले पैसे मॅच्युरिटीआधीही काढता येतील, मात्र त्यासाठी दंड भरावा लागेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/Financial/pages/content/post-office-saving-schemes.aspx

हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला 84,000% नफा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, नवीन दर तपासा
Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी
Stock Tips : दिवाळीत ‘या’ 5 शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा