नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या नागपुरातील दोघा मित्रांचा चंद्रभागा नदीत बुडून (drowned in chandrabhaga river) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. सचिन शिवाजी कुंभारे आणि विजय सरदार अशी मृत पावलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोघेही मित्र आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात दाखल झाले होते. मात्र मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर अंघोळ करावी म्हणून ते नदीत उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहून (drowned in chandrabhaga river) गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघेही तरुण नरखेड तालुक्यातील जलालखेडा आणि नारसिंगी येथील रहिवासी होते.
तिघे गेले होते, दोघे बुडाले
सचिन आणि विजय यांच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्रही सोबत होता. आपले मित्र बुडत (drowned in chandrabhaga river)असल्याचे पाहून तिसऱ्या मित्राने आरडाओरडा केला. आधी सचिन पाण्यात उतरला होता. त्याला नदीच्या वाढलेल्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू (drowned in chandrabhaga river) लागला. सचिनला वाचवण्यासाठी विजयही नदीत उतरला. पण दोघंही वाहून जात आहेत, हे लक्षात आल्यावर तिसऱ्या मित्राने किनाऱ्यावरुनच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
तिसऱ्या मित्राला पोहायला येत नव्हते त्यामुळे त्याने मदतीसाठी जोरजोराने आवाज दिला. कुणीतरी ओरडतंय हे पाहून स्थानिकांनी किनाऱ्याजवळ तातडीने धाव घेतली. यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने या दोघांना पाण्यातून (drowned in chandrabhaga river) बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पंढरपूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई
धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर
हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल
INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर