हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काल पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला.
दरम्यान रात्री भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केले. त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा तीव्र निषेध आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला.
त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज – बावनकुळे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींबाबतवादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ते म्हणाले की, पटोलेंना पंतप्रधानांबद्दल बोलताना लाज वाटत नाही. जगात क्रमांक एकचे पंतप्रधान त्यांच्याबाबत हे बोलत आहेत. हा वेडा झालेला माणूस आहे. त्याला नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी संपवल्याशिवाय ते राहणार नाही. नाना पटोले यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.