व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला; नारायण राणेंचे जुने ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एकीकडे भाजपचे नेते सावधपणे प्रतिक्रिया देत असताना महाविकासआघाडीतील सर्व नेत्यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यातच आता नारायण राणे यांचे जुने ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. फडणवीसांनी खडसेंचा राजकीय बळी घेतला असं विधान यामध्ये केलेले दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंचा राजकीय बळी घेतला असून भाजपमध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे अशा आशयाच्या एका ट्विटचा स्क्रिनशाॅट सोशल मिडियावर व्हायरल झालाय. भाजप नेते नारायन राणे यांच्या नावाने हे ट्विट असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, सदर ट्विट जूने असल्याचे बोलले जात आहे. ४ जुन २०१६ अशी तारिख व्हायरल ट्विटमध्ये दिसत आहे. हे ट्विट खरे आहे कि फेक आहे हे समजू शकलेले नाही मात्र यातील आशय आजच्या भाजपला बरोबर लागू होतोत अशी चर्चा नेटकर्‍यांमध्ये रंगत आहे.