“तुमची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा

sanjay raut narayan rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत “तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला. त्याच्या इशाऱ्याला केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे. “राऊत तुमची जागा आता बाहेर नाही, तुमची जागा आता आत आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले, तुम्ही फक्त मातोश्रीपुरते मर्यादीत आहात,” असा टोला राणेंना लगावला आहे.

भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज ट्विट करीत शिवसेना खासदार संजय राऊत याच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.

संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्री पुरतीच”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस संजय राऊत आता संपले असल्याचा इशारा राणेंनी दिला आहे.

संजय राऊतांनी काय केले आहेत आरोप?

आज सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर अनेक आरोप केले. “ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत? महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. तसेच अनिल देशमुखांच्या शेजारील कोठडीत जावे लागेल, असे भाजप नेते वारंवार सांगत असल्याचेही राऊतांनी म्हंटले आहे.