हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.
मोदी म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार येथील मजुरांना मुंबई महाराष्ट्रातून पलायन करण्यास काँग्रेसने भाग पाडले. त्यांना मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्राबाहेर पिटाळण्यात आले. त्यामुळेच जिथे करोना कमी होता त्या राज्यांनाही करोनाचा विळखा पडला.
मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजुरांना तिकीटं देण्यात आली. लोकांना प्रेरित करण्यात आलं. महाराष्ट्रात आमच्यावर जो बोज आहे तो जरा कमी व्हावा. तुम्ही जा… तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात. तुम्ही बिहारचे आहात. जा… तिथे कोरोना पसरवा असे म्हणत त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला.
काँग्रेस हा तुकडे तुकडे गँगचा लीडर आहे. फोडा आणि झोडा हेच काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसनेच तामिळी जनतेच्या भावनांचा अवमान केला होता. अनेक अतिशय चुकीच्या गोष्टी या पक्षाने आजवर केल्या आहेत. अजून १०० वर्षे तरी आपण सत्तेत येणार नाही अशा मानसिकता काँग्रेसने केली आहे. तसे असेल तर आम्हीही त्यांना सत्तेवर येऊ न देण्याची तयारी केली आहे.