नाशिकमध्ये भाजप नेत्याच्या घरावर सशस्त्र हल्ला आणि दगडफेक, आईलादेखील मिळाली धमकी

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक शहरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये सातपूर परिसरातील नेत्याच्या घरावर चाकू, सुरे घेऊन आलेल्या गुंडांनी हल्ला केला. सुदैवाने त्या हल्ल्याच्या वेळी सदर नेता घरात उपस्थित नव्हता. त्यामुळे हे गुंड या नेत्याच्या आईला धमकावून त्या ठिकाणाहून निघून गेले. भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे (vikram nagores) यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी हा हल्ला करण्यात आला आहे.

नाशिकमधील भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे (vikram nagores) यांच्या घरावर हा हल्ला झाला आहे. हातात चाकू, सुरे आणि पिस्तूल घेऊन या गुंडानी हा हल्ला केला आहे. या गुंडानी सातपूर परिसरातील नागरे यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच विक्रम नागरे यांच्या घरावर दगडफेकसुद्धा केली. याचबरोबर या गुंडानी घराच्या बाहेर लावलेले भाजप नेत्याचे बॅनरदेखील फाडले.

भाजप नेते विक्रम नागरे (vikram nagores) घराबाहेर असल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. हा हल्ला झाला तेव्हा नागरे यांच्या मातोश्री यावेळी घरात होत्या. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी नागरे यांच्या मातोश्रींना गुंडांनी धमकावले. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती