धक्कादायक ! सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Sucide) केली आहे. किरण पुराने असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या (Sucide) करण्याअगोदर किरण पुराने या कर्मचाऱ्याने घंटागाडी सुपरवायझर आपल्याकडे ठराविक रक्कमेची मागणी करत असल्याचा संदेश व्हाट्सअपवर शेअर केला होता एवढेच नाहीतर किरणने आत्महत्या यामुळेच करत असल्याचे देखील लिहिले होते. सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Sucide) केल्याने नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

व्हाट्सअपवर धक्कादायक खुलासा
किरण पुराने यांनी आत्महत्या (Sucide) केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मृत किरण पुराने यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मॅसेजमध्ये नामोल्लेख केलेल्या संशयित सुपरवायझरला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
किरण पुराने याच्या आत्महत्येप्रकरणी (Sucide) पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. किरण पुराने यांनी आत्महत्या नेमकी का केली, सुपरवायझरमध्ये आणि किरणमध्ये नेमक्या कोणत्या पैशांवरून वाद झाला होता याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, संशयित सुपरवायझर अटक केल्याशिवाय किरणचा मृतदेह ताब्यात घेणार असा आक्रमक पवित्रा किरणच्या कुटुंबीयांनी घेतला होता. यामुळे काही काळासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे पण वाचा :
किरकोळ कारणातून रिक्षावाल्याने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली

महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे करुणा शर्मावर गुन्हा दाखल

FIR नसलेल्या युवकालाच सैन्य भरतीत घेतले जाणार, प्रमाणपत्रही लागणार द्यावं; तिन्ही सेना दलाची मोठी घोषणा

राष्ट्रवादी ही लुटारू सरदाराची टोळी, माझ्याविरोधात कटकारस्थानच; हॉटेल उधारीवरून सदाभाऊंचा हल्लाबोल

कॅमेऱ्यापलीकडे कधीही बघत नव्हते मग सेनेशी संबंध कसा? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Leave a Comment