छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. दरम्यान, यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहे. आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी केली तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे नवनीत राणा यांनी म्हंटले.

खासदार रवी राणा यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहे. आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे. एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.

नेमके काय घडले प्रकरण?
अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. त्यानंतर आज अमरावती येथे राणा दांपत्याकडून ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला.

Leave a Comment