नवाब मलिकांचा वानखेडेंवर दुसरा हल्ला; पहिल्या लग्नाचे सर्टिफिकेट शेअर करत म्हणाले की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा एनसीबी समीर वानखेडे यांच्यावर हल्ला केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा उल्लेख ट्विटद्वारे केला आहे. नवाब मलिकच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा विवाह मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिम येथे गुरुवारी, 7 डिसेंबर 2006 रोजी रात्री 8 वाजता झाला.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट ट्विटर वर शेअर केले आहे. तसेच या लग्नावेळी साक्षीदार म्हणून समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन यांचे पती अजीज खान हे होते असा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचे प्रमाणपत्र ट्विटर शेअर केलं होतं.

आम्ही हिंदूच- क्रांती रेडकर

दुसरीकडे, समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी क्रांती रेडेकर यांनीही ट्विटरवर दावा केला आहे की, ती आणि तिचा पती समीर वानखेडे दोघेही जन्माने हिंदू आहेत. आम्ही कधीही इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केलेले नाही. आम्हाला सर्व धर्मांबद्दल आदर आणि आदरच आहे

Leave a Comment