हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओबीसी आरक्षणासंदर्भात पत्रं लिहिलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ओबीसी आरक्षण राज्याने रद्द केलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्बवली आहे, असा टोला नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आले असे नवाब मलिक यांनी म्हंटल.
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिण्यात आले.(१/२)#OBCreservation #OBC pic.twitter.com/bXthNMjniV
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 1, 2021
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यपालांनी पत्रात उल्लेख केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्याच्या निर्णयामुळे नाही हे त्यांना माहीत असायला हवे होते असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला.