हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनीसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये मलिक यांनी वानखेडे यांच्यावर त्यांच्या जातीवरून निशाणा साधला होता. दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मोठा दिलासा दिला देणारा निर्णय दिला आहे. वानखेडे यांची जात योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात स्थापन करण्यात आलेली एसआयटी रद्द करण्यात यावी, असे आदेश आयोगाच्यावतीने देण्यात आले आहेत. आयोगाचा निर्णय नवाब मलिकांसाठी झटका मानला जात आहे.
आयोगाच्यावतीने समीर वानखेडे याच्या जातीबाबत महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. तो म्हणजे आयोगाकडे उपलब्ध कागदपत्रांनुसार वानखेडे यांची जात अनुसूचित जातीच्या वर्गात मोडते आहे, असा निर्णय अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाकडून देण्यात आला. त्याचबरोबर आयोगाने वानखेडेंना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्यावतीने देण्यात आलेले आहेत.
आयोगाच्यावतीने वानखेडे यांच्याबाबत देण्यात आलेल्या निर्णयामुळे मलिक यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्याचबरोबर आयोगाच्यावतीने महाराष्ट्रात जात पडताळणी समितीनेही एक महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.