हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्यावतीने अनोख्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोर राज्यपालांच्या वेशातला डुप्लीकेट राज्यपालाच आंदोलनात आणला आणि त्यांचे थोतर फेडत निषेध व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधार्त आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आले. राज्यपालांनी राज्यपालांच्या निषेधार्त पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप शशीकांत काळे यांनी एक बॅनर लावले होते. आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणारच.
उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आहे. त्यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे बॅनरवर लिहण्यात आले होते. त्यानंतर आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत डुप्लीकेट राज्यपालांच धोतरच फेडले.
काय म्हणाले राज्यपाल?
मराठवाडा विद्यापीठातील एक कार्यक्रमावेळी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केले होते. ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असे म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.