मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकारणातील बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचं काम या दोघांनी केलं असलं तरी पवार घराण्यातील कुठ्ल्याही उमेदवाराविरुद्ध बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवार दिला नव्हता. सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत हा अनुभव मागील अनेक वर्षांपासून येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वरळी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ठाकरे कुटुंबीयांपैकी कुणीतरी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. ज्यावेळी सुप्रिया सुळे ह्या राज्यसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या त्यावेळी शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती आणि बाळााहेबांनी ही सुप्रिया सुळे यांना बिनविरोध निवडून देण्याचे वचन दिले होते. आज मात्र ठाकरे कुटुंबीयांना मदतीची गरज असताना पवारांनी डॉ सुरेश माने यांना आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध उमेदवारी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील संबंध ताणले गेल्याचं बोललं जात आहे. शिवसेना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसविण्याची धडपड करत असताना पवारांची खेळी आदित्यची विकेट घेणार का? हे येत्या निवडणुकीचा निकालच स्पष्ट करेल.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट@NCPspeaks@EknathKhadseBJP@BJP4Maharashtrahttps://t.co/iSzIQQsQAA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 3, 2019
मोहिते पाटलांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची जबर खेळी@PawarSpeaks @AjitPawarSpeaks@NCPspeaks https://t.co/R6mNekiExi
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 3, 2019
भाजपची तिसरी यादी जाहीर; महत्त्वाचे नेते अजूनही गॅसवरच..!!@EknathKhadseBJP@BJP4Maharashtra@NCPspeaks@INCIndia
https://t.co/MZmtg1wS33— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 3, 2019
आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी
भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ
स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट
खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द