हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबाबद्दल त्याचे आभार मानले आहेत.
”कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक व व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले दैनंदिन व्यवहार थांबवण्याच्या आवाहनाला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला त्यासाठी आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत.” असं लिहत शरद पवार यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी सामूहिक व व्यक्तिगत पातळीवर आपण एकजुटीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. @PMOIndia यांनी आपले दैनंदिन व्यवहार थांबवण्याच्या आवाहनाला देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी प्रतिसाद दिला त्यासाठी आपण सगळेजण धन्यवादाला पात्र आहोत. pic.twitter.com/jKztt1nLGh
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 22, 2020
दरम्यान, आज पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. आज करोडो भारतीयांनी घरामध्येच बसण्याचा निर्णय घेतला आहे. करोना विषाणूविरोधात जीवाचा धोका पत्करुन लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या तसेच बच्चे कंपनीनं थाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.