राष्ट्रवादीचा हा माजी खासदार करणार भाजपमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपमध्ये समावून घेण्यची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राभवण्यात आली होती. तीच प्रक्रिया विधनासभा निवडणूक पार पडे पर्यंत राभवलीजाईल असे चंद्रकांत पाटील यांनी भाकीत केले होते. त्यांचे भाकीत सध्या सत्यात उतरत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नावच घेत नसल्याने सध्या चित्र आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ; इंदापूर काँग्रेसला द्यायला राष्ट्रवादीचा नकार

राष्ट्रवादीचे लोकसभेचे माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपमध्ये जाणार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांच त्यांना लोकसभा निवडणुकीला पराभूत करण्यात मोलाची कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीप यांचा शरद पवार यांना तिकीट वाटपा पासून आग्रह होता की धनंजय महाडिक यांना तिकीट देऊ नये. मात्र धनंजय महाडिक यांच्या सारखा उमेदवार पक्षाला शोधून सापडला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत स्वकीयायांनीच त्यांचा पराभव घडवून आणला. अशा सर्व पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक राष्ट्रवादीत नाराज आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा आहे.

उदयनराजे भोसलेही भाजपच्या वाटेवर?

धनंजय महाडिक यांचे सख्खे चुलत भाऊ अमल महाडिक सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यांना गतवेळी निवडणूक जिंकण्यास धनंजय महाडिक यांनी मोठी मदत केली होती हा भाजपचा धनंजय महाडिक यांच्या प्रति असणारा सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे भाजप त्यांना पक्षात घेऊन काही तरी जबाबदारीचे पद देण्याची शक्यता नाकारता येणार नाही.. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी सोडण्याचे राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात तगडा मराठा नेताच उरणार नाही. त्यामुळे साताऱ्या नंतर राष्ट्रवादीला कोल्हापूर जिल्ह्यात देखील खिंडार पडणार हे नक्की आहे.

विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF

WhatsApp Nambar – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur

कराडमध्ये गोळीबारात एक जण ठार

पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर

Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर

गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश

विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका

 

Leave a Comment