जुन्नर प्रतिनिधी | अजित पवार यांच्या विधानांनी नेहमीच वादळ उठतात याचाच प्रत्यय आज आला आहे. गिरीश महाजन यांनी काल कलम ३७० मधील जाचक अटी काढण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या दुरुस्ती विधेयकाच्या जल्लोषात सहभागी होतांना कार्यकरतासोबत नाच केला. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महाजनांचे नाव नघेता त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )
तिकडं नाशिकला पूर आला आहे. तर मंत्री मोहोदय नाचकामात दंग आहेत. नाच्याचे काम आपले नाही नाही मंत्री मोहोदय असे अजित पवार म्हणाले आहेत. तुम्ही माझ्या सोबत असाल तर मी कोणाच्या बापाला देखील घाबरत नाही. तुम्ही अशीच साथ ठेवा पुढील काही दिवसात आणखी काही लोक जातील. त्याची फिकीर करू नका. आपल्या राज्यता १७५ जागा आहेत आणि आपल्याला आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आणायचे आहे असे अजित पवार म्हणाले आहेत.
३७० च्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी मोदीसरकार बद्दल दिली हि प्रतिक्रिया
येत्या १५ ऑगस्टला ग्रामापंचायतीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी ठराव घ्या. ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यास आपला विरोध आहे. त्यामुळे आपल्याला त्या विरोधात आंदोलन करायचे आहे. म्हणून तुम्ही त्याची सुरुवात ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्यापासून करा असे अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.