मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर काल सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयानं मजुरांचा खर्च कोण करत आहे, याविषयी केंद्राला प्रश्न विचारला होता. त्यावर केंद्राची बाजू मांडणारे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च मूळ राज्य आणि मजुर काम कामाला असलेली राज्य करत आहेत, असं म्हटलं होतं. तुषार मेहता यांच्या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.
”केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारनं दिले. त्यामध्ये केंद्र सरकारनं कुठलाही पैसा खर्च केला नाही. भाजपा आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरकारी वकिलांच्या विधानावरून स्पष्ट होतं. हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी मा. सर्वोच्च न्यायालयाला सांगितले कि परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारने दिले. त्यामध्ये केंद्र सरकारने कुठलाही पैसा खर्च केला नाही. pic.twitter.com/7yVUXKeC5S
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 29, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”




