हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान दसरा मेळाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत निशाणा साधला. “फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढूनार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगावे कि इंधन दर का वाढले? असा सवालही मलिक यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक षटकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला असता तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात दिसले असते, असे म्हंटल आहे. पण पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेने जे उत्तर दिले तेच उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.
सध्या पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पेट्रोल डिझेलने शतक मारले आहे. आहे. यूपीएच्या काळात ६० रुपये होते तेव्हा यावर प्रश्न उपस्थित करत होते. भाजपवाले त्यावेळी सत्ता आली की पेट्रोल डिझेलचे दर कमी करु, असे आश्वासन देत होते. संसद चालू देणार नाही ही भूमिका घेत होते. आता मोदींनी सांगावं की दर का वाढले? असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.