मोदीजी तुम्हाला कळकळीची विनंती, आता तरी….; खासदार अमोल कोल्हेंचे पंतप्रधानांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे महापूर व दरडी कोसळून लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय मंजूर करण्यात आला आहे. भारतीय लष्कराला दारुगोळा, शस्त्रास्रांचा पुरवठा करणा-या ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विभागणी करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण करु नका, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी केली आहे.

डॉ. कोल्हे यांनी पत्रात म्हंटले आहे की, भारतीय लष्कराला दारुगोळा, शस्त्रास्रांचा पुरवठा करणा-या ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत नुकताच मंजूर केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन सर्व ऑर्डनन्स फॅक्टरींच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करावा. तसेच आंदोलनकर्त्या कामगारांविरोधात कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात, अशी विनंती केली आहे.

सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयविरोधात लोकशाही मार्गाने कायद्यानुसार आंदोलन करणाऱ्या ट्रेड युनियन आणि फेडरेशन यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहेत. लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपणे हा चुकीचा मार्ग आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळ असा तब्बल २२१ वर्षांचा गौरवशाली इतिहास ऑर्डनन्स फॅक्टरींचा आहे. परंतु केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व ४१ ऑर्डनन्स फॅक्टरींचे ७ खासगी कंपन्यांमध्ये विभाजनाचा निर्णय देश व कामगार हिताचा नाही.

राज्यात महापुराची संकट असताना केंद्रात मात्र, वेगळेच वातावरण आहे. या ठिकाणी कॅबिनेटच्या बैठका घेतल्या जात असून अनेक महत्वपूर्ण असे निर्णय घेतळे जात आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच एक निर्णय दिल्लीत कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

You might also like