हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारभाराला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे. सात वर्षात महागाई कमी झाली नाही… पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत… लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाहीत… दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही अस ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे
प्रधानमंत्री मोदीजी ने पहले दिन से जो वादे किए थे, उन में से एक भी वादा पुरा नही हुआ है। महंगाई कम नही हुई, पेट्रोल के दाम कम नही हुऐ, लोगों के खातों मे १५ लाख रुपए नही आए, हरसाल दो करोड लोगों को रोजगार देने का वादा किया था, वो भी पूरा नहीं किया – @nawabmalikncp#7YearsOfFailure
— NCP (@NCPspeaks) May 31, 2021
कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही, आशा शब्दांत नवाब मलिक यांनी मोदी सरकारचे वाभाडे काढले.
करोड़ों लोग रोजगार से वंचित हो गए। अर्थव्यवस्था पुरी तरह से चौपट हो गई है। हमें लगता है इससे बडी नाकामी कोई नही हो सकती। सात साल में महंगाई ज्यादा बढ़ गई, मानवी जीवन मे कोई बदलाव इन सात सालोंमे नाही आया, ये सच्चाई है, ऐसी टिपणी @nawabmalikncp जी ने की है।#7YearsOfFailure
— NCP (@NCPspeaks) May 31, 2021
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.