केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज ; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून तब्बल 60 दिवस होऊनही शेतकरी आणि सरकार यांच्यातील तोडगा निघाला नाही. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला खडेबोल सुनावलं आहेत

केंद्र सरकारनं 60 दिवसांपासून आंदोल करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलन सुरु झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले या चुकीच्या गोष्टी होत्या, अशी टीका रोहित पवार यांनी केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केले.

दरम्यान, केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघठनातर्फे आझाद मैदान येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. नाशिकवरून शेतकऱ्यांचा मोठा जथ्था मुंबईत पोहोचत आहे. राज्याच्या इतर भागातून सुद्धा शेतकरी पोहोचत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोर्चामध्ये उद्या हजर राहणार असून, काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला समर्थन दिले असल्याचं प्रकाश रेड्डी यांनी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like