फडणवीसांचा वार, पवारांचा पलटवार!! प्रत्येक आरोपांना खणखणीत प्रत्युत्तर; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याची सुरुवात झाली फडणवीस यांच्या एका विधानाने… शरद पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडलं ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी जे केलं ती बेईमानी? असं कस चालेल असा सवाल फडणवीसानी केल्यानंतर शरद पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर देत देवेंद्र त्यावेळी प्राथमिक शाळेत असतील म्हणून त्यांना इतिहास माहित नाही असा खोचक टोला लगावला. तसेच पवारांनी स्थापन केलेल्या तेव्हाच्या सरकारमध्ये कोण कोण होत याचा इतिहासही ऐकवला.

आजच्या आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, मी बेईमानी कधी केली हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं ? १९७७ मध्ये आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी जनसंघ म्हणजे आत्ताच्या भाजपचा सुद्धा मला पाठिंबा होता. कदाचित हा इतिहास फडणवीस यांना माहीत नसेल. त्यांचं वाचन कमी असेल किंवा त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, पण त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, की त्यावेळी मी सर्वाना सोबत घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. फडणवीस लहान असल्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहित नसेल असा टोला पवारांनी लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील ओबीसी चेहरे हे केवळ दिखाव्यासाठी आहेत पण त्यांना पदे दिली जात नाहीत असा आरोप फडणवीसांनी केला होता, त्यावरही पवारांनी जोरदार पलटवार करत आत्तापर्यन्त किती ओबीसी नेत्यांना राष्ट्रवादीने पद दिली याचा वाचून दाखवला.राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर मधुकर पिचड प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर सुनील तटकरे अध्यक्ष झाले ते कोण आहेत? हे सर्व नेते ओबीसी आहेत. त्यामुळे अशाप्रकारची टीका करून फडणवीस यांनी पुन्हा आपलं अज्ञान दाखवलं आहे असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले.