हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या एमआयएमने राज्य सरकारला मोठी ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईत होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली असल्याने यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी एमआयएमवर निशाणा साधला आहे. ” एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावं. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक जिंकणार नाही अशी टीका मलिक यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कुठलाही पक्ष सत्तेत असला तरी नियमांचं पालन करणं त्यांची जबाबदारी आहे. शिवाजी पार्कवर रॅलीसंदर्भात हायकोर्टाचे दिशानिर्देश आहेत. काँग्रेस कोर्टात गेले आहे. जर कोर्टाने निर्देश दिले तर रॅली होईल परवानगी मिळेल. एमआयएमची चौक सभा होती की सभा, हे ओवैसींनी सांगावे, असे आव्हान यावेळी मलिक यांनी केले आहे.
एमआयएमच्या मोर्चाला दीड हजार लोक होते, नियम आणि कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणं राजकिय पक्षाची जबाबदारी होती. कितीही जागा लढवल्या तरी एमआयएम निवडणूक जिंकणार नाही, ऊमेदवार भेटणार नाही, यासाठी अशा घोषणा केल्या जात आहेत, असे नवाब मलिक यांनी म्हंटले.