हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबीमधील आणखी काही चुकीच्या गोष्टींना एक्सपोज आज अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करीत म्हंटले होते. दरम्यान आज त्यांनी गंभीर आरोप केले. “एनसीबीच्या फर्जीवाडा, आर्यन खान प्रकरणातील आरोपी, बोगस कागदावरील सही प्रकरण या संदर्भात मी अनेक खुलासे केले. मात्र, ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्यावतीने खोट्या स्वरूपात कारवाया करण्यात आलेल्या असून या प्रकरणात एनसीबीने 25 कोटींचे डील केले आहे. भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे, असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीच्यावतीने केलेल्या अनेक चुकांची पोलखोल केला. मागील एक वर्षांपासून एसीबीच्या माध्यमातून मुंबईत फर्जीवाडा करून लाखो रुपयाची वसुली करण्यात आली. या फर्जीवाड्यात एसीबीचे अनेक मोठं मोठे अधिकारी सहभागी आहेत. या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीने आतापर्यंत काय कारवाई केली? असा सवाल मलिक यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे.
Addressing the Press Conference. https://t.co/WNeQDVEuKu
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 2, 2022
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करताना मलिक म्हणाले की, ३१ डिसेंबर रोजी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अजूनही त्यांना एक्स्टेन्शन दिले किंवा नवी जबाबदारी दिली आहे. याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही.
वानखेडे अनेक माहिती प्रसिद्ध करत आहेत की मला एक्सटेन्शन नको आहे. मी तीन महिने सुटीवर जाणार आहे. पण माझ्या माहितीनुसार दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. ३१ तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केले गेले नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केले गेले? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिले जावे. अजून निर्णय झालेला नाही”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.