‘दीड फुटांचा आमदार अन्…’, नितेश राणेंवर टीका करताना विद्या चव्हाणांची जीभ घसरली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखं बोलतो. अजित पवारांवर बोलण्याआधी तुम्ही कोण आहात, याचा विचार करा,’ अशी टीका विद्या चव्हाण (vidya chavan)यांनी केली आहे.

नेमक्या काय म्हणाल्या विद्या चव्हाण
जागर महागाईचा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेवेळी विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही ‘कामाख्या देवीकडे जाऊन जादू टोणा करून सत्ता आणली पण ती टिकणार नाही. आमच्याकडे साडेतीन शक्तीपीठं आहेत. तुम्ही कामाख्या देवीला जाता, कारण तिकडे जादूटोणा चालतो म्हणून,’ असे विद्या चव्हाण (vidya chavan) म्हणाल्या आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाहीत तर स्वराज्य रक्षक आहेत,असं वक्तव्य अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली. त्यांनी राज्यात ठिकठिकाणी याबाबत आंदोलने केली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख धरणवीर असा केला. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तरसुद्धा दिले होते.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू