पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. जेव्हा चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले तेव्हा त्याचा ताशी वेग ११० ते १२० किमी होता. त्याचे परिणाम आजूबाजूच्या परिसरातील हवामानावर जाणवले. शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण परिसरात अनुक्रमे ४४.१, ९७.३, ५१.२ मिमी पाऊस पडला आहे.
हे वादळ आता महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत आहे. त्यामुळे पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सध्या वादळाचा वेग थोडा कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही म्हणून प्रशासनाने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. या वादळी वाऱ्याचा परिणाम म्हणून जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
चक्रीवादळ पुढे सरकले आहे. त्याचे परिणाम म्हणून महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. जोरदार वारे वाहते आहे. कोकणात काही ठिकाणी समुद्राचे पाणी नागरी वस्तीत पोहोचले आहे. आणखी सहा तास हे वादळ असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.