Friday, June 2, 2023

देशात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?? अजित पवारांनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन चा प्रसार वेगवान होत असून याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरु आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनात दिली. यावेळी अजित पवार यांनी मास्क न लावणाऱ्या सदस्यांची देखील कानउघाडणी केली.

अजित पवार म्हणाले की, काही जणांना मास्क घालता बोलता येत नाही. परंतु बोलून झाल्यानंतरही मास्क लावलं पाहिजे. इतकी वाईट परिस्थिती आहे की कोणालाही याचा अंदाज नाही. त्यामुळे देशपातळीवर रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, ओमीक्रोन चा वाढता प्रसार पाहता केंद्र सरकार यापूर्वी च सतर्क झाले आहे. केंद्राने काही दिवसांपूर्वी सर्व राज्यांना पत्र लिहून काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 100% लसीकरण, रुग्णांच्या संख्येनुसार कंटेनमेंट झोन आणि बफर झोन निश्चित करणे, विवाह आणि अंत्यसंस्कार साठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अशा सूचना आहेत.