‘उद्धव ठाकरेंनी आता 11 आमदारांना घेऊन IPL टीम बनवावी; निलेश राणेंची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांसोबत घेऊन जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या बंडानंतर शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करत जहरी टीका केली आहे. “पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. त्यांनी मातोश्रीवर 11आमदारांना घेऊन IPL टीम बनवावी, अशी टीका राणेंनी केली आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “शिवसेनेचे ११/१२ आमदार शिवसेनेसोबत राहतील अशी परिस्थिती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे ११/१२ घेऊन IPL team साठी तयारी करा. मातोश्री 11 बनवा.”अशी टीका करत राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना टोला लगावला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी नुकतेच शिवसेनेचे नेते तथा आमदार शंभूराज देसाई यांच्यासह तर चाळीस बंडखोर आमदारांना पत्राद्वारे व्हीप जारी केला आहे. वर्षा निवास स्थानी होणाऱ्या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

Leave a Comment