हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हिऱ्यांचा व्यापारी असलेल्या नीरव मोदी याच्या भारताशी प्रत्यार्पणाच्या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. नीरव मोदी याच्यावर फसवणूक आणि पैशाच्या अफ़रातफ़रीचे गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी, यूकेच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन अर्ज रद्द केला होता आणि त्याला ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.
नीरव मोदी याच्यावर भारतातील पंजाब नॅशनल बँकेकडून दोन अब्ज डॉलर्स (चौदा हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या) कर्जाची फसवणूक आणि पैशाच्या घोटाळ्याचा आरोप आहे तसेच त्याला फरार घोषित केले गेले आहे.आपल्या प्रत्यार्पणाच्या आदेशाला त्याने यूकेच्या न्यायालयात आव्हान दिले आहे.४९ वर्षीय नीरव मोदी सध्या दक्षिण पश्चिम लंडनच्या तुरुंगात आहे.
Fugitive diamond merchant Nirav Modi’s extradition trial to begin in London’s Westminster Magistrates’ Court today. There are fraud and money laundering charges against him. pic.twitter.com/w5CQ8eu80v
— ANI (@ANI) May 11, 2020
मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याच्या याचिकेशी संबंधित सुनावणी ही पाच दिवस चालणार आहे. ब्रिटन सरकारने भारताच्या अर्जावर कारवाई करण्यास मान्यता दिली होती. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि दक्षता संचालनालय या दोन तपास यंत्रणांनी मोदींविरोधात हा खटला दाखल केला आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की भारतीय बँकेची बनावट संमती दर्शवून त्याने परदेशातील बँकांकडून कर्ज घेतले आणि त्या पैशामध्ये फेरफार केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.