कणकवलीत नितेश राणे भाजपचे उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली मध्ये गेले असता स्वाभिमान पक्षाचे नेते  नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केले.  कणकवली मधील  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याच्या कार्यालया समोर हे स्वागत करण्यात आल.  सोबतच नारायण राणे यांचे भाजप प्रवेश लवकर होणार असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील जागा देखील नितेश राणे भाजपमधून लढवतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. तेव्हा आता नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी होतो? आणि कणकवलीतून नितेश राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळते काय? हे पहाणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.