हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या उत्पादन होत असलेली वीज आणि राज्याला आवश्यक असलेली वीज यात जवळपास अडीच ते तीन हजार मेगावॉट वीजेची तफावत आहे. अशात यंदा उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जेव्हा उष्णता वाढते तेव्हा उर्जेचा वापरही मोठ्या प्रमामावर होतो. राज्यात आज जी वीज टंचाई आहे त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका होऊ लागल्याने त्याला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे. वीज तुटवड्यामुळे लोडशेडिंगचे संकट निर्माण होणार असल्याने यामागचे कारण गडकरी यांनी सांगितले आहे.
राज्याला वीज पुरवठा करण्यासाठी केंद्राकडून काहीच मदत केली जात नसल्याचा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. त्यावरून भाजप नेते नितीन गडकरी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी वीज टंचाई तसेच कोळशाच्या तुटवड्यामागचे कारणच समोर मांडले आहे.
नागपुरात एका कार्यक्रमप्रसंगी गडकरी म्हणाले की, “कोळशा कोळशा कंपनी वेस्टर्न कोल फिल्ड्सने स्वस्त कोळसा दिल्यामुळेच आज गरिबांना स्वस्त वीज मिळत आहे. मात्र, सध्या कोळशाची आयत कमी झाली असल्याने वीज निर्मिती करण्यास अडचणी येईत आहे. प्रशासनाने 4 – 4 वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. यापूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता.
ज्या कोळसा खाणी बंद आहेत किंवा आर्थिक अडचणीत आहेत. त्या कोळसा खाणी सुरु करण्यासाठी राज्य सरकारने खाजगीकरणाचा वापर करावा. कोळसा कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमोनियम नायट्रेटचा तुटवडा आपल्या देशात आहे. वेस्टर्न कोल फ्लिड्सने अमोनियम नायट्रेट व मिथेनचे उत्पादन करण्याची परवानगी द्यावी. याच बरोबर डीएमई बनविले तर घरगुती वापरासाठी गॅसमध्ये ते मिसळता येईल व सिलेंडरचा दर स्वस्त होईल, असे गडकरी म्हणाले.