हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी अलीकडेच मुंबईत आपला ड्रीम प्रोजेक्ट NMACC चे उद्घाटन केले आहे. त्यासाठी त्यांनी अगदी भव्य अशा पार्टीचे आयोजनही केले होते. ज्यामध्ये हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील अनेक सेलेब्रिटी, क्रीडा जगतातील दिग्गज आणि राजकारणी सहभागी झाले होते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या या सांस्कृतिक केंद्राद्वारे भारतीय कलांना जागतिक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल. मात्र आता लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे की, त्यामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी उपलब्ध असतील तसेच त्यामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळेल का ??? चला तर मग आजच्या या बातमीमध्ये आपण NMACC च्या खास बाबी जाणून घेउयात
NMACC चे सर्वात आकर्षण म्हणजे त्याचे The Grand Theatre. इथे 2000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे सोनेरी आणि लाल थीमवर बांधलेल्या या भव्य नाट्यगृहात बाल्कनीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी 8500 हून जास्त स्वारोवस्की क्रिस्टल्सचा वापर केला गेला आहे. यासोबतच 18 डायमंड बॉक्स देखील बनवण्यात आले आहेत. हे नाट्यगृह कमळाच्या थीमसहीत भव्य झुंबराने सजवले गेले आहे. NMACC
याच्या मिनी थिएटरमध्ये जवळपास 250 लोकं बसू शकतील.तसेच दुसऱ्या बाजूला एक ‘स्टुडिओ थिएटर’ देखील बांधण्यात आले आहे. यामध्येही 250 लोकांच्या एकत्रितपणे बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. छोटे सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून हे बनवले गेले आहे. यामध्ये मिनी स्टेजजवळील कमी प्रकाशामुळे त्याला वेगळाच लुक मिळतो. NMACC
हे मिनी थिएटर खास मैफिली, नाटके आणि लहान कार्यक्रमांसाठी बनवले गेले आहे. तसेच जर आपल्याला एखादी कार्यशाळा किंवा चर्चासत्र घ्यायचे असेल तर त्यासाठीची व्यवस्थाही इथे केली जाते. यासाठी एक वेगळा क्यूब शेपमधील इंटीमेट स्पेस देण्यात आला असून त्यामध्ये 125 जणांची बसण्याची व्यवस्था केली गेली आहे. या सांस्कृतिक केंद्रात चार मजली आर्ट हाऊस देखील आहे. जे सुमारे 16,000 स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधले गेले आहे. हे आर्ट हाऊस स्वतंत्रपणे तयार करण्यात आले असून ही जागा आर्ट गॅलरी संस्थेसाठी असेल. NMACC
तसेच या सांस्कृतिक केंद्राच्या बाहेरील भागात पाणी,आग, ध्वनी, प्रकाश या थीमवर एक फाउंटन देखील तयार करण्यात आले आहे. त्याला फाउंटन ऑफ जॉय असे नाव देण्यात आले आहे. इथे दररोज 30 मिनिटांच्या फाउंटन शोचा आनंद घेता येईल. हे लक्षात घ्या कि, यासाठी तिकीट देखील घ्यावे. तसेच लहान मुले, वडीलधारी मंडळी आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवेश असेल. बाकीच्या लोकांकडून मात्र कार्यक्रमानुसार शुल्क आकारले जाईल. NMACC वेबसाइट वरील माहितीनुसार, त्याचे तिकीट 199 रुपयांपासून सुरू होऊन ते 500 रुपयांपर्यंत आहे. सध्या त्याची सर्व तिकिटे विकली गेली असून ते हाऊसफुल्ल झाले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://nmacc.com/
हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
ICICI Mutual Fund : ‘या’ 10 स्किम बाबत जाणुन घ्याल तर व्हाल मालामाल; पैसे 3-4 पटीने वाढवून मिळण्याची हमी..