नवी दिल्ली । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) एक्मेकांद्वारे पसरणाऱ्या रोगांसाठी (Vector Borne Disease) विमा पॉलिसी (Insurance Policy) आणण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर भागधारकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत. डास, टिक्स व माश्यांच्या संसर्गामुळे वेक्टर जनित रोग पसरतात. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे प्रमुख वेक्टर जनित आजार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गेल्या वर्षीच्या अहवालानुसार, वेक्टर-जनित आजारांमधे 17 टक्के आणि वर्षाकाठी 7 लाखांहून अधिक मृत्यू होतात.
पॉलिसीअंतर्गत एक वर्षाचा विमा
IRDAI च्या या आरोग्य विमा योजनेमुळे तुम्हाला डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर एक वर्षाचा विमा मिळू शकेल. सध्या तयार केलेल्या प्रस्तावाअंतर्गत हे प्रॉडक्ट्स एका वर्षाच्या कालावधीसाठी देऊ शकते. यामध्ये वेटिंग पीरियड 15 दिवसांचा असेल. या विमा पॉलिसीमध्ये डेंग्यू, मलेरिया, फायलेरियासिस, ब्लॅक-अझर, चिकनगुनिया, जपानी एन्सेफलायटीस आणि झिका विषाणूसारख्या वेक्टर-जनित रोगांचा समावेश असेल.
पॉलिसीमध्ये कोणाकोणाचा समावेश असेल
मसुद्यात दिलेल्या माहितीनुसार या प्रॉडक्ट्सचे नाव वेक्टर बॉर्न डिसीज हेल्थ पॉलिसी असे असेल. हे ‘सिंगल प्रीमियम’ प्रॉडक्ट असेल, म्हणजे यामध्ये प्रीमियम हा एकदाच भरावा लागेल. या प्रीमियम प्रॉडक्ट्स साठी किमान वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच, 1 वर्षापासून ते 25 वर्षांपर्यंतच्या मुलांवर अवलंबून असणारी मुले देखील या अंतर्गत येतील.
म्हणूनच आरोग्य विमा महत्त्वपूर्ण आहे
पॉलिसी बाजारचे आरोग्य विमा प्रमुख अमित छाबरा म्हणतात की, वेक्टर-जनित रोग लक्षात घेऊन आम्ही येत्या काळात ग्राहकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. भारतातील डेंग्यू, मलेरिया यासारख्या वेक्टर-जनित आजारामुळे बरीच लोकसंख्या बाधित आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळे बरेच लोक मरतात. पैसे नसणे हे उपचार न मिळण्याचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून अशा रोगांच्या उपचारांसाठी आरोग्य विमा मिळविणे फार महत्वाचे आहे
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.