आता YouTube च्या ‘या’ नवीन फिचरनुसार आपण ठेऊ शकाल लहान मुलांवर लक्ष, फीचर नक्की कसे आहे ते जाणून घ्या !

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युट्युब हे माहितीचे भंडार आहे. येथे हवी ती माहिती मिळू शकते. माहितीचे भांडार असल्यामुळे लहान मुले यामध्ये भरकटू शकतात. लक्ष भरकटणारे माहितीपट आणि व्हिडिओजचा मोठा भरणा असल्यामुळे, अनेक मुलांचे लक्ष यामधून भरकटते. यामुळे युट्युबने नवीन फिचर आणले असून. मुले काय पाहतात हे पालकांना समजू शकणार आहे. सोबतच, यामार्फत, काहीच साईटचा एक्सेस मुलांना देता येणार आहे.

हे फीचर मोबाईलमध्ये ऍक्टिव्हेट करायचे असेल तर, त्याची सोपी पद्धत आहे. तीन वेगवेगळ्या सेटिंग्स या नव्या फीचरसाठी कंपनी जारी करणार आहे. सुपर बॉईज गुगल अकाऊंट हे या तीन सेटिंग करण्यासाठी पालकांना ऑप्शन देणार आहे. या सेटिंगमध्ये एक्सप्लोर, एक्सप्लोर मोर आणि मोस्ट ऑफ युट्युब यांचा या सेटिंग्समध्ये समावेश आहे. एक्सप्लोर ही अशा मुलांसाठी सेटिंग आहे, ज्यांचे वय नऊ वर्षावर पासून अधिक आहे. या मध्ये vlog, टिटोरियल, गेमिंग, म्युझिक क्लिप सोबतच न्युज यांचा समावेश असणार आहे.

‘एक्सप्लोर मोर’ ह्या सेटिंगमध्ये तेरा वर्षाहून अधिक वयोगटासाठीच्या मुलांच्या वयोगटाचा समावेश आहे. ही सेटिंग ठेवल्या नंतर व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. सोबतच लाईव्ह पाहता येणे कॅटेगरीमध्ये येईल. तसेच, ‘मोस्ट ऑफ युट्युब’ यामध्ये जवळपास सर्व व्हिडिओ पाहू शकणार आहेत. केवळ वयाचे बंधन असणारे व्हिडिओ पाहू शकणार नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here