आता रेल्वेचे जनरल तिकीटही ‘या’ ॲपच्या माध्यमातून बुक करता येणार, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी UTS on mobile या ॲपच्या माध्यमातून अनारक्षित जनरल तिकीट बुक करण्याची सुविधा पुन्हा एकदा सुरू केली आहे. आता भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करणारे प्रवासी मोबाईलमधूनच जनरल तिकीट बुक करू शकणार आहेत. सध्यातरी ही सुविधा भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच ही सुविधा इतर रेल्वे झोनमध्येही सुरू करण्यात येईल.

‘युटीएस ऑन मोबाईल’ हे एक मोबाईल ॲप असून, भारतीय रेल्वेने मोबाईल प्लॅटफॉर्मवरती हे ॲप लॉन्च केले होते. या मोबाईलच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेमध्ये अनारक्षित जनरल तिकीट सोप्या पद्धतीने बुक आणि कॅन्सल करू शकतात. हे ॲप आणण्याच्या मागे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट हे कॅशलेस, पेपरलेस आणि रेल्वे स्टेशनवर तिकीटासाठीची गर्दी कमी करणे असा आहे.

आपणही रेल्वेचे अनारक्षित जनरल तिकीट बुक करणार असाल तर, वरील ॲप मोबाईलमध्ये इंस्टॉल करा. इन्स्टॉल करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम प्ले स्टोरवरून हे ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲपमध्ये मोबाइल नंबर, नाव, लिंग आणि जन्मतारीख नोंदवा. मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून नोंदणी करा. यानंतर लॉगइन करून आपण तिकीट बुक करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment