आता कोरोनासोबत आनंदाने जगणं शिकलच पाहिजे, त्यासाठी हे झक्कास १७ उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे जगभरातून केले जात आहेत. अनेक शास्त्रज्ञ लस शोधण्यात व्यस्त आहेत. सध्या संक्रमण टाळण्यासाठी संचारबंदी ही जगात अनेक ठिकाणी लागू करण्यात आली आहे. मात्र इतक्या लवकर आणि सहज हा विषाणू आपल्यामधून जाणार नाही असे शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी सांगितले आहे. त्यामुळे या विषाणूची लस येईपर्यंत अथवा याचा समूळ नायनाट होईपर्यंत घरातच वाट पाहत बसणे शक्य नाही. त्यामुळे आपण घराबाहेर पडून आपले दैनंदिन जीवन जगू शकतो. अशी माहिती यु.एस.ए मधील मेरीलँड विद्यापीठातील संसर्गजन्य रोग क्लिनिक चे प्रमुख डॉ फहीम युनूस यांनी दिली आहे.

Faheem Younus, MD (@FaheemYounus) | Twitter
आता थोडेसे प्रामाणिक आणि व्यावहारिक – संसर्गजन्य रोग क्लिनिक, मेरीलँड विद्यापीठ, यु.एस.ए प्रमुख. 

१. कदाचित आपल्याला पुढचे काही महिने किंवा वर्षे Covid-१९ सोबत राहावे लागेल. त्यामुळे हे नाकारून किंवा घाबरून चालणार नाही. आपले आयुष्य निरुपयोगी होऊ देऊ नका. या वस्तुस्थितीसह जगणे शिकूया
२. ४-५ लिटर गरम पाणी पिऊन पेशींच्या आत गेलेल्या Covid -१९ विषाणूला तुम्ही नष्ट करू शकत नाही. फारतर अनेकदा बाथरूमला जाऊ शकता.
३. हात धूत राहणे आणि १-२ मीटर भौतिक अंतर राखणे ही  सुरक्षित राहण्याची उत्तम पद्धत आहे.
४. जर तुमच्या घरी Covid -१९ चा रुग्ण नसेल तर तुमच्या घरातील पृष्ठभागाचे सतत निर्जंतुकीकरण करण्याची गरज नाही आहे.
५. पॅक केलेला माल, गॅस पंप, शॉपिंग कार्ट तसेच एटीएम कार्ड यांच्यामुळे संसर्ग होत नाही. हात धूत राहा आणि नेहमीप्रमाणे तुमचे आयुष्य जगा.
६. Covid -१९ चा संसर्ग अन्नातून होत नाही. याचा संसर्ग फ्लू सारख्या संसर्ग बिंदूतून होतो. घरी खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यामुळे Covid -१९ चे संक्रमण झाल्याचा कोणताच धोका दाखवला गेला नाही.
७. तुम्ही तुमची वास घेण्याची क्षमता (सेन्स) गमावू शकता हे Covid -१९ चे एकमेव अनपेक्षित लक्षण आहे.
८. घरी आल्यावर त्वरित कपडे बदलण्याची आणि अंघोळ करण्याची आवश्यकता नाही. शुद्धता हे पुण्य आहे. मानसिक आजार (विकृती) नाही.
९. Covid -१९ चा विषाणू हवेमध्ये लटकून राहत नाही. हा श्वसनमार्गाचा संसर्ग आहे. त्याला संपर्काची आवश्यक्ता असते.
१०. हवा शुद्ध आहे तुम्ही बागेत फिरायला जाऊ शकता (फक्त सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून)
११. Covid -१९ विषाणूच्या विरोधात सामान्य साबण वापरणे ठीक आहे. तो विषाणू आहे जिवाणू नाही.
१२. खाद्यपदार्थांची ऑर्डर दिल्याबाबद्दल काळजी बाळगण्याची आवश्यक्ता नाही. पण अगदीच वाटत असेल तर तुम्ही ते मायक्रोवेव्ह मध्ये गरम करू शकता.
१३. आपल्या चपलांमधून Covid -१९ चे विषाणू घरात आणणे म्हणजे दिवसातून दोनदा विजेचा झटका लागण्यासारखे आहे. मी २० वर्षांपासून या विषाणू विरोधात काम करतो आहे. याचे संक्रमण असे होत नाही.
१४. व्हिनेगार, उसाचा रस, आले वापरून विषाणूपासून बचाव करता येत नाही. हे रोगप्रतिकार शक्तीसाठी आहेत उपचारासाठी नाहीत.
१५. खूप काळ मास्क वापरल्याने तुमच्या श्वासोच्छ्वास क्रियेत आणि ऑक्सिजन घेण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. केवळ गर्दीच्या ठिकाणीच तो वापरा.
१६. हातमोजे घालणे देखील वाईट कल्पना आहे. विषाणू सहज हातमोजामध्ये जमा होऊ शकतो आणि तुम्ही चेहऱ्याला स्पर्श केल्यावर तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे सतत हात धूत राहणे उत्तम आहे.
१७. नेहमी निर्जंतुक वातावरणात राहिल्याने प्रतिकारशक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे अन्न खात असाल तरी तुमच्या घरातून बाहेर बागेत किंवा समुद्रकिनाऱ्यावर जात जा. घरी बसून तळलेले, मसालेदार आणि गोड अन्नपदार्थ खाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही तर रोगप्रतिकारकांच्या साथीने ती वाढत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.