नवी दिल्ली । फास्टॅगला (Fastag) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI, एनएचएआय) फास्टॅगमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द केले आहे. ही सुविधा केवळ कार, जीप किंवा व्हॅनसाठी (Car, Jeep, Van) असून ती व्यावसायिक वाहनांसाठी (Commercial Vehicles) नाही.
NHAI ने फास्टॅग जारी करणार्या बँकांना विचारले आहे की, सिक्योरिटी डिपॉझिट शिवाय अन्य मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक करू शकत नाही. याआधी विविध बँका फास्टॅगमधील सिक्योरिटी डिपॉझिटस व्यतिरिक्त मिनिमम बॅलन्स ठेवण्यास सांगत होते. काही बँका किमान दीडशे रुपये तर काही बँका 200 रुपयांचे बॅलन्स ठेवण्यास सांगत होत्या. मिनिमम बॅलन्स असल्यामुळे, अनेक फास्टॅग युझर्सना त्यांच्या फास्टॅग खात्यात / वॉलेट मध्ये पुरेशी शिल्लक असूनही टोल प्लाझामधून जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. यामुळे टोल प्लाझावर अनावश्यक वाद होत असल्याने अनेकदा मागून येणाऱ्या वाहनांची गैरसोय होत आहे.
जर बॅलन्स शून्य झाला तर कार फास्टॅग लाइनमधून बाहेर पडू शकणार नाही
NHAI च्या म्हणण्यानुसार, फास्टॅग खात्यात / वॉलेट मध्ये कोणतीही नकारात्मक शिल्लक नसल्यास आता युझर्सना टोल प्लाझामधून जाण्याची परवानगी दिली जाईल. फास्टॅग खात्यात पैसे कमी असेल तरीही कारला टोल प्लाझा ओलांडू दिला जाईल. टोल प्लाझा ओलांडल्यानंतरही फास्टॅग खाते नकारात्मक राहिले तर आणि ग्राहकाने तरी ते रिचार्ज केले नाही तर बँक सिक्युरिटी डिपॉझिटमधून नकारात्मक खात्याची रक्कम वसूल करू शकेल.
फास्टॅगचा एकूण टोल कलेक्शन 80%
देशभरात 2.54 कोटीहून अधिक फास्टॅग युझर्स आहेत. महामार्गावरील एकूण टोल कलेक्शनमध्ये FASTag चे 80 टक्के योगदान आहे. सध्या ‘FASTag’ या माध्यमातून डेली टोल कलेक्शन 89 कोटींच्या पुढे गेले आहे. विशेष म्हणजे, 15 फेब्रुवारी 2021 पासून, फास्टॅग मार्गे टोल प्लाझावर टोल भरणे अनिवार्य होईल. कारण नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया देशभरातील टोल प्लाझावर 100% कॅशलेस टोल मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”