सरकारचं अपयश झाकण्यासाठीचं संजय राऊत लेख लिहून लक्ष वळवतात- देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे । गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं याबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आपली बाजू स्पष्ट केली. आपल्याला राज्यात सध्या सत्तेवर असणारं महाविकासआघाडी सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, असं म्हणत हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळेच पडेल असा सूर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आळवला. तसेच सरकारचं अपयश झाकायचं असेल तेव्हा संजय राऊत सरकार पाडण्याबाबत लेख लिहून लक्ष वळवतात, असं म्हणत त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवरही बोचरी टीका केली. ठाणे येथे एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी राज्यातील कोरोना व्हायरसची सद्यस्थिती आणि राज्य सरकारची त्यावर असणारी भूमिका, त्यासाठी उचलली जाणारी पावलं यावरल आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील आणि विशेष म्हणजे ठाण्यामध्ये अतिशय झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी राज्य सराकरनं कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची विनंतीही त्यांनी शासनाकडे केली.

राज्यातील एमएमआर क्षेत्रांचा दौरा केल्यानंतर या भागांमध्येच सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याचं म्हणत अनुक्रमे ही आकडेवारी ६० आणि ७३ टक्के असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. शिवाय या भागांमध्ये समन्वय नसल्यामुळं चाचणीचे निकाल मिळण्यासही दिरंगाई होत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी सर्वांपुढं ठेवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment